खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात, ओव्हरटेक करताना झाली टक्कर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला सोमवारी भीषण अपघात झाला.
खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात, ओव्हरटेक करताना झाली टक्कर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला सोमवारी भीषण अपघात झाला. राजधानी दिल्लीमधील बी. डी. मार्गावर झालेल्या अपघातात सुदैवाने गोडसे थोडक्यात बचावले. तथापि, दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

प्राथमिक माहितीनुसार, शिवजयंतीनिमित्त दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संसदेमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार गोडसे दिल्लीत होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते परत जात होते. त्यावेळी एका गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीसोबत भीषण टक्कर झाली. गोडसे त्यांच्या टोयोटा इनोव्हा गाडीत (MH 15 FC 9909 ) होते आणि अर्टिगा (DL 7 CW 2202) गाडीसोबत टक्कर झाल्याचे समजते. सुदैवाने अपघातात गोडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in