Nashik : निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ओझरमध्ये १०.५ अंश तापमान

जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशात सुरू असलेल्या हिमवर्षावाचा परिणाम राज्यात हवामानावर दिसू लागला आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
Nashik : निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ओझरमध्ये १०.५ अंश तापमान
Nashik : निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ओझरमध्ये १०.५ अंश तापमान
Published on: 

लासलगाव : जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशात सुरू असलेल्या हिमवर्षावाचा परिणाम राज्यात हवामानावर दिसू लागला आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे.

तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून ओझर येथे १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घसरण होत असल्याने पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता आणि दुपारी उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे.

निफाड तालुका राज्यातील थंडीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. यंदा थंडीचे उशिराने झालेले आगमन आणि आता अचानक वाढलेल्या गारठयामुळे नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरांमध्ये ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)