Nashik Onion Crisis: केंद्र सरकारकडू कांदा निर्यातबंदी: संतप्त शेतकऱ्यांचा सिन्नर येथे रास्तारोको

केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचे निर्णय घोषित केल्याने त्याचा थेट परिणाम हा कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे
Nashik Onion Crisis: केंद्र सरकारकडू कांदा निर्यातबंदी: संतप्त शेतकऱ्यांचा सिन्नर येथे रास्तारोको

कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटनांनी शेतकरी नेहमी हवालदिल असतो. अशा त्याच्या शेतमाला चांगला भाव मिळाला तर सुखावतो. शेतकऱ्यांना कधीकाळी रडवणारा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावह समाधान दिसत होते. तेवढ्यात केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळ शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. केंद्र कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांद्यांची निर्यात बंदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे सध्या चार ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जाणारा कांदा जवळपास एक हजार रुपायांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिन्नर येथील बाजार समितीत कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी संतप्त होत रास्ता रोको केला आहे.

साठवून ठेवलेला कांदा अपेक्षित किंमतीला विकाला जाईल या अपेक्षेने बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणायला सुरुवात केली होती. मात्र, केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचे निर्णय घोषित केल्याने त्याचा थेट परिणाम हा कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. काद्यांला एक हजार रुपये देखील भाव मिळेल की नाही अशी भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या निवडणूका तोंडावर आहेत. सरकार निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून केवळ शहरी लोकांच्या फायद्यासाठी सरकारने निर्यात बंदी लावल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे.

सध्या सरकारच्या निर्णयानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्यावर निर्यातबंदी लावण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावल्याचं कळताच शेतकऱ्यांनी संतप्त होत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. सिन्नर बाजार समिती समोरील व विवेक चौक येथे कांद्याने भरलेली वाहने रस्त्यावर उभी करुन शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. त्यामुळे शिर्डी आणि निफाड बाजूने येणारी वाहतुकीवर याचा परिणाम होऊन वाहतूक ठप्प झाली.

संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केल्याची माहिती मिळताच सिन्नरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे संतप्त झालेले शेतकरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु होती.

logo
marathi.freepressjournal.in