सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात घसरण; मागणीत घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता

कांद्याला चांगला दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याचे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये दिसून आले.
सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात घसरण; मागणीत घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता
सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात घसरण; मागणीत घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता
Published on

हारून शेख/लासलगाव :

कांद्याला चांगला दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याचे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये दिसून आले. कांद्याची आवक तुलनेने घटलेली असतानाही लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दर खाली आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यातील बुधवार, १६ सप्टेंबरच्या तुलनेत पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या कमाल दरात तब्बल ८०० रुपयांची घसरण झाली आहे. १६ सप्टेंबर रोजी ६ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचलेला कमाल दर आता ५ हजार ७०० रुपयांवर आला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी दरात ४०० रुपयांची घट झाली असून, ४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचलेला सरासरी दर आता ४ हजार १०० रुपयांवर आला आहे. येवला बाजार समितीतही कांद्याच्या दरात ६०५ रुपयांची घसरण झाली असून, ५ हजार २५१ रुपयांवर गेलेला दर आता ४ हजार ६४६ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

दक्षिणेकडील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच मध्य प्रदेशात जुन्या उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील कांद्याच्या मागणीत घट होऊन दरावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात कांद्याचे दर फार वाढण्याची शक्यता सध्या दिसत नाही.

प्रवीण कदम, कांदा निर्यातदार

logo
marathi.freepressjournal.in