दोन ट्रकांमध्ये इको कारचा चुराडा; नाशिक-पेठ महामार्गावरील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

नाशिक - पेठ महामार्गावर असलेल्या सावळघाट येथे झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. पुढील ट्रक आणि मागून आलेला ट्रक यांच्यामध्ये इको कार मधल्यामध्ये चेपली गेली. Meta Description (Marathi): नाशिक-पेठ महामार्गावरील सावळाघाट येथे दोन ट्रकांच्या मध्ये इको कार चिरडल्याने चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
दोन ट्रकांमध्ये इको कारचा चुराडा; नाशिक-पेठ महामार्गावरील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
दोन ट्रकांमध्ये इको कारचा चुराडा; नाशिक-पेठ महामार्गावरील भीषण अपघातात चौघांचा मृत्यूX | PTI
Published on

नाशिकः नाशिक - पेठ महामार्गावर असलेल्या सावळघाट येथे झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. पुढील ट्रक आणि मागून आलेला ट्रक यांच्यामध्ये इको कार मधल्यामध्ये चेपली गेली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. इको कारमध्ये बसलेल्या चौघांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (दि.१४) सायंकाळी मारुती ओमनी इको गाडी नाशिकहून पेठच्या दिशेने जात होती. याचवेळी सावळाघाट येथे तीव्र उतारावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाले. ट्रकवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने तो ‘इको’वर जावून धडकला आणि पुढे असलेल्या ट्रक यांच्यामध्ये इको कार दाबली गेली. या अपघातात इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in