नाशिक रिंगरोड : संरेखनाची तीन दिवसांत चौकशी; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

नाशिक येथील कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या संरेखनाची (अलाइनमेंट) तीन दिवसात तर रिंग रोडमध्ये ज्यांनी जमिनी घेतल्या त्या प्रकरणाची चौकशी तीन दिवसांत चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.
नाशिक रिंगरोड : संरेखनाची तीन दिवसांत चौकशी; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
नाशिक रिंगरोड : संरेखनाची तीन दिवसांत चौकशी; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : नाशिक येथील कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या संरेखनाची (अलाइनमेंट) तीन दिवसात तर रिंग रोडमध्ये ज्यांनी जमिनी घेतल्या त्या प्रकरणाची चौकशी तीन दिवसांत चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. रिंगरोडच्या कामात कोणत्याही शेतकऱ्यावर बळजबरी केली जाणार नाही. तसेच त्यांना कायद्यानुसार योग्य आणि समाधानकारक मोबदला दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात नाशिक रिंगरोडच्या अलाईनमेंटमध्ये जाणीवपूर्वक उद्दिष्ट ठेवून बदल करण्यात आल्याचा आणि यामध्ये जमिनींचे गैरव्यवहार होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक रिंगरोडसाठी जबरदस्ती भूसंपादन करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार यादीत ज्यांच्या जमिनींचा सर्व्हे क्रमांक नव्हता, त्यांचा नंतर समावेश करण्यात आला. काही विशिष्ट व्यक्ती आणि कंपन्यांच्या फायद्यासाठी अलायन्मेंट बदलण्यात आली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यावर रिंगरोडची अलाईनमेंट नेमकी का बदलली गेली. उद्दिष्ट ठेवून जाणीवपूर्वक बदलल्या गेली का याची चौकशी तीन दिवसांत केली जाईल.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, या प्रकरणाची अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये तीन वेळा करण्यात आलेल्या बदलांची सखोल तपासणी केली जाईल. चौकशी अहवालानुसार दोषी अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, शासनाला जमीन देण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असेल किंवा अलाइनमेंट बदलाची पूर्वकल्पना घेऊन शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या असतील, तर संबंधितांवरही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in