Nashik : 'जादूटोणा विरोधी कायदा रद्द करा, नाहीतर...' नाशिकमध्ये साधू महंतांचा इशारा

नाशिकमध्ये (Nashik) रामकुंडावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यासाठी साधू महंतांची पार पडली बैठक
Nashik : 'जादूटोणा विरोधी कायदा रद्द करा, नाहीतर...' नाशिकमध्ये साधू महंतांचा इशारा

महाराष्ट्र जारी केलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यासाठी साधी महंत आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये (Nashik) रामकुंडावर या संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व आखाड्यांचे महंत तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थिती दर्शवली. या बैठकीत राज्य सरकारकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. गेले काही दिवस धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितींमध्ये वाद सुरु आहेत. अशामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोधात साधू संत आक्रमक आहे.

यासंदर्भात नाशिकमध्ये बैठक झाली असून यात जादूटोणा विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी आवाहन करत नाशिकमधील साधू म्हणून त्यांना एकत्र केले. नाशिकमधील सर्व साधू महंत एकवटले असून राज्य सरकारला निवेदन करणार आहेत की, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रात लवकरात लवकर रद्द करावा. कारण या कायद्याचा जो उद्देश आहे हा कुठेतरी भरकटला आहे. फक्त आणि फक्त हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री जोशी यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in