नाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात; महिला कंडक्टरसह एका प्रवाशाचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांत नाशिकच्या एसटी अपघातांमध्ये वाढ होतानाचे चित्र दिसत असताना आणखी एका अपघाताची घटना घडली
नाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात; महिला कंडक्टरसह एका प्रवाशाचा मृत्यू

नाशिकमधील देवळा मनमाड मार्गावर एसटीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये महिला कंडक्टरचा मृत्यू झाला असून एका प्रवासीचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. तसेच, एसटीमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिकमधील एसटी अपघातांमध्ये वाढ होत असून चिंतेचा मुद्दा बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळा मनमाड मार्गावर असलेल्या चांदवड शहरानजीक मतेवाडीजवळ एसटीचा भीषण अपघात झाला. ही एसटी मनमाड आगारातून सुटून नांदुरीकडे जात होती. यामध्ये एसटीची महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. तर, एका प्रवाशी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहणारे एसटी बसला कट मारल्याने एसटीचा रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. एसटी थेट रस्त्याकडेच्या झाडावर आपटली आणि हा भीषण अपघात झाला. या एसटीच्या एका बाजूचा संपूर्ण चक्काचूर झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in