Nashik : नाशिकमध्ये ५० हुन अधिक कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश; ठाकरे गटाला दणका

एकीकडे आदित्य ठाकरे शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये (Nashik) येणार असतानाच त्यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे
Nashik : नाशिकमध्ये ५० हुन अधिक कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश; ठाकरे गटाला दणका

एकीकडे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसंवाद दौरा आयोजित केला असून नाशिकसह (Nashik) औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी भेटी देणार आहेत. अशामध्येच शिंदे गटाने मात्र नाशिकमध्ये त्यांना चांगलाच धक्का दिला आहे. कारण, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटातील ५० हुन अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे हा शिवसेना ठाकरे गट तसेच आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिक हा तसा शिवसेनाच बालेकिल्ला मानला जातो. परंतु, एकनाथ शिंदेच्या बंडानंतर यामध्येही २ गट पडले. त्यानंतर नाशिकमध्ये अनेकदा ठाकरे गटाच्या नेत्यांनी नाशिकमध्ये पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांनी संवाद साधत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही प्रत्येक बड्या नेत्याच्या दौऱ्यादरम्यान ठाकरे गटातील काही कार्यकर्ते हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे गटामध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मागील वेळेस खासदार संजय राऊत यांनीदेखील नाशिक दोनदा भेट दिली होती. मात्र, दोन्हीही वेळेस काहींनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in