Nashik : संभाजीनगर जिल्ह्यातील भाविकांचा ट्रॅक्टर नांदगावजवळ दरीत कोसळला; दोन महिला ठार; १३ जण जखमी

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे श्री पिनाकेश्वर महादेव दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ट्रॅक्टर खोल दरीत कोसळल्याने दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर इतर १३ जण जखमी झाले. सर्व भाविक संभाजीनगर जिल्ह्यातील खामगाव तालुका कन्नड येथील होते.
Nashik : संभाजीनगर जिल्ह्यातील भाविकांचा ट्रॅक्टर नांदगावजवळ दरीत कोसळला; दोन महिला ठार; १३ जण जखमी
Published on

नाशिक : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे श्री पिनाकेश्वर महादेव दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ट्रॅक्टर खोल दरीत कोसळल्याने दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर इतर १३ जण जखमी झाले. सर्व भाविक संभाजीनगर जिल्ह्यातील खामगाव तालुका कन्नड येथील होते.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास देवदर्शन करून घाट उतरत असताना ट्रॅक्टर सुमारे दोनशे फूट खोल दरीत गेल्याने ट्रॉलीमधील ताबाई नारायण गायके (वय ५६), कमलबाई जगदाळे (वय ६२) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, अप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आदित्य योगेश कवडे, हे भाविक जखमी झाले.

जखमींवर बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून छत्रपती संभाजी नगर येथील घाटी या शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी भाविक तसेच पर्यटकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ खोल दरीत उतरत सर्व जखमींना बाहेर काढून स्वतःच्या वाहनामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवले.

logo
marathi.freepressjournal.in