उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यासह बाय बी चव्हाण येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत जवळपास तासभर चर्चा चालली. यानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हा सर्वाचे दैवत आदरणीय शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली. शरद पवार हे आज बैठकीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे असल्याचं समजल. यामुळे वेळ न मागताच भेट घेतली असल्याचं पटेल म्हणाले.
यावेळी प्रफुल्ल पटले यांनी शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहील यावर चर्चा यावर विचार करुन येत्या काही दिवसात मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा देखील प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना दिला. यावेळी शरद पवार यांनी आमचं म्हणणं ऐकूण घेतलं मात्र, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असं प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितलं.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांची बैठक पार पडली. ही बैठक नेमकी कशासंदर्भात होती. तसंच या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक पार पडली. महत्वाचं म्हणजे या बैठकीनंतर अजित पवार गटातील मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे हे मंत्री रवाना झाले होते. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुत्रीफ, छगन भुजबळ या मंत्र्यांचा समामेश होता.