राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा; नवापूर तालुक्यात वादळी वारे, बळीराजा संकटात

नवापूर तालुक्यातील ढोंग परिसरात बुधवारी दुपारी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे जोरदार वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि आलेल्या चक्रीवादळाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत घरांचे पत्रे उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले असून, शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे.
राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा; नवापूर तालुक्यात वादळी वारे, बळीराजा संकटात
राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा; नवापूर तालुक्यात वादळी वारे, बळीराजा संकटातप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नागपूर : नवापूर तालुक्यातील ढोंग परिसरात बुधवारी दुपारी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे जोरदार वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि आलेल्या चक्रीवादळाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत घरांचे पत्रे उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले असून, शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे.

दुपारच्या सुमारास आलेल्या या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, ढोंग गावातील अनेक कच्च्या घरांवरील छपरे आणि पत्रे कागदासारखे हवेत उडून गेले. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. घरात पावसाचे पाणी शिरल्याने धान्य आणि कपड्यांचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

पावसामुळे शेतात उभी असलेली पिके झाली आडवी

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतात उभी असलेली पिके आडवी झाली आहेत. हातातोडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या बळीराजासमोर आता या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे.

भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सायंकाळच्या सुमारास आलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील कापणीला आलेले धान पीक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या अस्मानी संकटामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती ओढवली आहे.

जळगावातही पावसाची हजेरी

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधीसह अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे वाढत्या उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राजगड तालुक्याला जोडणाऱ्या वेल्हे-नसरापूर मुख्य मार्गावर जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अडवली गावच्या हद्दीत मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन प्रवाशांचे हाल झाले

logo
marathi.freepressjournal.in