Navle Bridge Accident : पुणे अपघातप्रकरणी ट्रकचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रकचालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रकचालकासह क्लिनरचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला.
Navle Bridge Accident : पुणे अपघातप्रकरणी ट्रकचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Published on

पुणे : पुणे शहरातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रकचालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रकचालकासह क्लिनरचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला.

याप्रकरणी ट्रकचालक रुस्तम रूदार खान (वय ३५, रा. किरवारी, किसनगड, जि. खेरतल, राजस्थान), क्लिनर मुस्ताक हनीफ खान (वय ३१, रा. मनापुरी, रासगड, जि. अलवर, राजस्थान), ताहीर नासीर खान (वय ४५, रा. किसनगड, राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘अपघातात ट्रक चालक रुस्तम खान, क्लिनर मुस्ताक खान यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातात ताहीर खान गंभीर होरपळला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१, १२५ (अ), (ब), ३२४ (४), मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९, १७७ अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

नवले पूल येथे गुरुवारी झालेल्या अपघातानंतर शुक्रवारी सकाळी मोहोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम आदी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘२०२२ मध्ये येथे मोठा अपघात झाला होता. त्यानंतर जांभूळवाडी ते वडगावपर्यंत सातत्याने होणारे अपघात थांबविण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यातील रम्बलर्सची संख्या वाढवणे, स्पीड गन्स वाढवणे, पंक्चर्स बंद करणे यासारख्या काही अल्पकालीन उपाययोजना अंमलातही आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु,​ गुरुवारच्या दुर्दैवी अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कायमस्वरूपीच्या उपाययोजनांना गती देणे आवश्यक आहे.

दीर्घकालीन उपाययोजनांची गरज - मोहोळ

पुण्यातील नवले पूल परिसरात गुरुवारी रात्री झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. अल्पकालीन उपाययोजनांसंदर्भात शनिवारी संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेतली जाईल. तसेच नऱ्हे ते रावेत व्हाया सुतारवाडी या उन्नत मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) मंजूर झाला असून त्याला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल,अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.

logo
marathi.freepressjournal.in