नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबाने चालवलेल्या रिअल इस्टेट फर्मने दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबाने चालवलेल्या रिअल इस्टेट फर्मने दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला. सर्व आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे निर्देशही दिले.

नवाब मलिक यांच्या कुटुंबियांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चरने दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. त्यावर पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी निर्णय दिला. दोषमुक्तीचा अर्ज फेटाळत न्यायालयाने सर्व आरोपींविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२च्या संबंधित कलमांतर्गत आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले. त्या गुन्ह्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपींना आरोप निश्चित करण्यासाठी १८ नोव्हेंबरला हजर राहण्याचे निर्देश दिले.

logo
marathi.freepressjournal.in