"सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही..." अजित दादांच्या सिद्धिविनायक दर्शनावर संजय राऊतांची टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी सिद्धिविनायकाला साकडं घातलं.
"सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही..." अजित दादांच्या सिद्धिविनायक दर्शनावर संजय राऊतांची टीका

मुंबई: राष्ट्रवादी अजित पवार गटानं आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी सिद्धिविनायकाला साकडं घातलं. यावेळी अजित पवारांसोबतच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी लोकांसमोर जाणार आहोत, त्यासाठी सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेतला, असं अजित पवार यावेळी म्हणाले. तर अजितदादांनी पाप केलंय, सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

अजित दादांनी घेतली सिद्धिविनायकाची भेट:

सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर अजित पवार म्हणाले की, "आम्ही आता जनतेसमोर जाणार आहोत, त्यामध्ये जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकानं आम्हाला आशीर्वाद द्यावेत. त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत. परंतु या सगळ्या गोष्टींची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते, तो चांगला दिवस आज आला आहे."

अजित दादांनी पाप केलं, सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही: संजय राऊत

दरम्यान अजित पवार यांच्या सिद्धिविनायक दर्शनावर संजय राऊत म्हणाले की, "ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेतायत, ती चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायकाला पाप-पुण्य समजतं. पुण्य कोण करतंय, पाप कोण करतंय, चोऱ्या लबाड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येतंय, हे सगळ्यांना कळत असतं. त्याच्यामुळं ज्याप्रकारचे पाप एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलं आहे, सिद्धिविनायक अशाप्रकारे आशीर्वाद देत नाही."

logo
marathi.freepressjournal.in