राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले मोठे विधान; म्हणाले...

राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले मोठे विधान; म्हणाले...

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती, यावरही दिले स्पष्टीकरण...

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असल्याच्या बातम्या आल्या. अशीच एक चर्चा नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दलही झाली सुरु होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनीदेखील जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार, असा दावा त्यांनी केला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, "महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार, हे आता सगळ्यांनी मान्य केलेले आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येणार," असे मत त्यांनी व्यक्त केले. पुढे अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेल्या इच्छेबद्दल बोलताना ते म्हणाले की, "जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमताने चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in