
एकीकडे पुण्यामध्ये पोटनिवडणुकीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. तर दुसरीकडे कसबा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने गोपनीयतेचा भंग केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतदानादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गोपनीयतेचा भंग केला असल्याचे समोर आले आहे.
कसबा मतदारसंघामध्ये मतदान करत असताना राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनसोबतचा फोटो काढला. तर, त्यांनी तो फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केला. गोपनीयतेचा भंग केल्याने निवडणूक आयोगातर्फे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रुपाली ठोंबरे पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कसबा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.