
एकीकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्णांमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते निवास्थानी विश्रांती घेत आहेत. काल ते येवला दौऱ्यावर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला. यावेळी डॉक्टरांनी त्यांना अराम करण्याचा सल्ला दिला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगितले.
"माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या २-३ दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे काही कारण नाही. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा." असे आवाहन करत त्यांनी आपल्या प्रकृतीची माहिती ट्विट करून दिली आहे.
दरम्यान, काल छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने येवल्यावरुन नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचा निकालामध्ये कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, राज्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. तसेच, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.