Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

चालकाचे गाडीवरचा नियंत्रण सुटले आणि धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) गाडीला अपघात झाला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती
Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला रात्री १२.३०ला अपघात झाला. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि ग्रामस्थांच्या भेटी घेऊन ते परळीकडे परत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती देण्यात आली. सध्या धनंजय मुंडे यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती देण्यात आली असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत या अपघाताबद्दल माहिती दिली होती. यामध्ये लिहिले आहे की, "काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास माझ्या गाडीचा अपघात झाला. परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे." काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in