शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; गडचिरोली जिल्ह्यातील पक्षाचे पहिले नगराध्यक्ष काँग्रेसमध्ये

गडचिरोली जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, कविता पोरेड्डीवार, विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद सदस्य लालसु पोगाटी, शिवसेनेचे गजानन नैताम व त्यांचे सहकारी व कार्यकत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; गडचिरोली जिल्ह्यातील पक्षाचे पहिले नगराध्यक्ष काँग्रेसमध्ये
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; गडचिरोली जिल्ह्यातील पक्षाचे पहिले नगराध्यक्ष काँग्रेसमध्ये
Published on

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, कविता पोरेड्डीवार, विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद सदस्य लालसु पोगाटी, शिवसेनेचे गजानन नैताम व त्यांचे सहकारी व कार्यकत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असून नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे राजकारणाला कलाटणी देणारा पक्ष प्रवेश आहे, असा विश्वास काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अॅड. कविताताई मोहरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, सतीश विधाते, गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडवार, हर्षलता येलमुले, वासेकर, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, मनोहर पाटील पोरेटी, शमशेर खान पठाण, प्रतिक बारसिंगे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओबीसीचे अस्तित्व जपण्यासाठी, त्यांचे आरक्षण, हक्क आणि अधिकार अबाधित राखण्यासाठी नागपूर येथे जो महामोर्चा काढला, त्या मोर्चाचे खच्चीकरण करण्याकरिता काही दिवसांपूर्वी मला आयकर विभागामार्फत नोटीस बजावण्यात आली. जनतेसाठी लढणाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. जनतेच्या सर्व प्रश्नांना घेऊन आम्ही सदैव लढत राहणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

कार्यप्रणाली घातक - सपकाळ

फलटण घटनेवरून आज राज्यात कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती झाली आहे हे लक्षात येईल. कोणालाच धाक राहिला नसून रक्षकच भक्षक होत चालले आहे, तर सर्व सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गृहविभागाची कार्यप्रणाली जनतेसाठी घातक ठरत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ भाषणात म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in