मविआ विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची ठाम भूमिका

येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ (मविआ) एकत्रितपणे लढणार आहे, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी जाहीर केली.
शरद पवार
शरद पवार
Published on

पुणे : येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ (मविआ) एकत्रितपणे लढणार आहे, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी जाहीर केली.

ते म्हणाले की, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढतील. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांच्या हितांचे रक्षण करावे, हीच त्यांची नैतिक जबाबदारी आहे.

राज्यात सरकार बदलणे गरजेचे

महाराष्ट्रात विरोधी पक्ष जनतेसमोर एक सामूहिक चेहरा ठेवेल. राज्यात आता बदल घडवण्याची गरज आहे. हे काम पूर्णत्वास नेणे ही विरोधी आघाडीतील पक्षांची नैतिक जबाबदारी आहे. महाभारतात अर्जुनाचे लक्ष्य ‘माशाचा डोळा’ होता. आता आमचे लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकीवर लागले आहे. राज्यात जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाही, पण ती लवकरच केली जाईल, असे ते म्हणाले.

छोट्या पक्षांच्या हिताचे रक्षण करू!

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने ‘मविआ’ला चांगला प्रतिसाद दिला. आमच्या आघाडीत डावे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हेही सामील होते. मात्र, आम्ही त्यांना लोकसभेसाठी जागा दिल्या नाहीत. आता या पक्षांच्या हिताची रक्षा करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीत या पक्षांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in