
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून महायुतीच्या काळात राज्यात नेमकं काय सुरु आहे. महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात नेमकं काय सुरु आहे, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वाॅच असणार आहे. यासाठी राष्ट्रवादीची शॅडो कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढा, यासाठी पक्षातील मोठ्या नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी खासदार, आमदार उपस्थित होते.
महायुती सरकारने राज्यात १०० दिवसांचे लक्ष ठेवले आहे. महायुतीच्या सत्ता काळात १०० दिवसांत काय गोष्टी घडतात, कुठल्या गोष्टींचा विकास यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष असणार आहे. यासाठी राष्ट्रवादीने शॅडो कमिटीची स्थापना केली आहे. यात जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील व जयप्रकाश दांडेगांवकर आदींवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. जिथे रिक्त पद असतील तिथे पद भरली जाणार आहेत. पदाधिकारी बदलायची जर गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलले जातील. पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी यावेळी दिल्या. शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाले.
शॅडो कमिटीतील नेते
मराठवाडा - राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगांवकर
विदर्भ - राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख.
कोकण - जितेंद्र आव्हाड आणि सुनिल भुसारा.
प. महाराष्ट्र - हर्षवर्धन पाटील .
उत्तर महाराष्ट्र - हर्षवर्धन पाटील.