दहीहंडी संदर्भात राष्ट्रवादीची मोठी मागणी,  उपमुख्यमंत्र्याना दिलं निवेदन

दहीहंडी संदर्भात राष्ट्रवादीची मोठी मागणी, उपमुख्यमंत्र्याना दिलं निवेदन

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तसेच कार्यकर्ते यांचा उत्साह वाढला आहे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तसेच कार्यकर्ते यांचा उत्साह वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतिनं मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात यावी. तसंच गोपालकाल्याच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी. यासह दहीहंडी मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे, या मागण्या करण्यात आल्या.

राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागीय कार्यध्यक्ष नरेंद्र राणे आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह गोविंदांनी देवगिरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन हे निवेदन दिलं आहे. यात मागीलवर्षाप्रमाणे यंदाही बालगोपाळांचा विमा उतरवण्यात यावा, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याता आला आहे. मात्र, सरकारमार्फत याबाबत उपाययोजना झालेल्या नाही. तरी आपण पुढाकार घेऊन सरकार व दहीहंडी पथकांमध्ये समन्वय साधून या साहसी खेळासाठी स्पर्धा आयोजित करावी. आयोजकांवरील जाचक अटी शिथील करव्या. या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनी भाजपसह जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. शरद पवार यांनी मात्र पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार करत पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in