राष्ट्रवादीच्या संजय गरुड यांचा भाजपप्रवेश

जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे पारंपरिक राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड व विलास राजपूत यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला
राष्ट्रवादीच्या संजय गरुड यांचा भाजपप्रवेश

जळगाव : जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे पारंपरिक राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड व विलास राजपूत यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी गिरीश महाजन उपस्थित होते.

संजय गरुड हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेले काही दिवस जिल्ह्यात सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या गटबाजीला कंटाळून संजय गरुड यांनी २५ जानेवारी रोजी पक्षाच्या प्राथमिक सदस्य व पदाचा राजीनामा दिल्याचा त्यांनी जाहीर केले होते. तेव्हापासूनच संजय गरुड हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर मंगळवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला. यांच्यासोबत जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अनेक माजी जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पक्षाचे पदाधिकारी यांनी भाजपात केला. संजय गरुड यांच्या प्रवेशाने जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून, महाजनांना विरोधकच न राहील्याने जामनेरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

पारंपरिक राजकीय वैर संपले

जामनेर विधानसभा निवडणूकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर आव्हान उभं करणारे पारंपरिक राजकीय विरोधक असणारे संजयदादा गरुड आज भाजपात प्रवेश केल्याने या दोन नेत्यांमधील पारंपरिक राजकीय वैर देखील मिटले आहे. गेल्याच आठवडयात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. आणखीही काही राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in