महिला, दिव्यांग डब्यांत पॅनिक बटन बसवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी, रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती

मुंबई उपनगरीय रेल्वेतील महिला आणि दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व महिला व दिव्यांग डब्यांमध्ये पॅनिक बटन, इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा आणि सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महिला, दिव्यांग डब्यांत पॅनिक बटन बसवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी, रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती
महिला, दिव्यांग डब्यांत पॅनिक बटन बसवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी, रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंतीसंग्रहित छायाचित्र
Published on: 

पुणे : मुंबई उपनगरीय रेल्वेतील महिला आणि दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व महिला व दिव्यांग डब्यांमध्ये पॅनिक बटन, इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा आणि सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच नायगाव रेल्वे दुर्घटनेतील पीडित तरुणीला न्याय, आर्थिक मदत आणि पुनर्वसन मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

४ नोव्हेंबर २०२६ रोजी बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणीची छेडछाड करण्यात आली. तिने विरोध केल्याने आरोपीने तिला नायगाव रेल्वे स्थानकावर रुळांवर ढकलले.

या घटनेत तरुणीचा डावा हात कोपरापासून कापावा लागला असून, डोक्याला १६ टाके पडले आहेत. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अंतर्गत कठोर कारवाई करून पीडितेला जलदगतीने न्याय द्यावा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे.

पॅनिक बटन दाबताच मदत मिळावी

पीडितेच्या उपचारांसाठी, कृत्रिम हातासाठी आणि दीर्घकालीन पुनर्वसनासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष आर्थिक मदत द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. पॅनिक बटन दाबताच मोटरमन, ट्रेन मॅनेजर, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना तातडीने सूचना मिळून मदत पोहोचली पाहिजे. तसेच महिला व दिव्यांग डब्यांमध्ये सीसीटीव्ही, नियमित पोलीस गस्त आणि रेल्वे सुरक्षा हेल्पलाइन १३९ ची माहिती ठळकपणे लावावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महिला आणि दिव्यांग प्रवाशांना सुरक्षित व निर्भयपणे प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून विशेष कृती आराखडा राबवावा, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)