आदिवासी मुलांच्या विक्री प्रकाराची नीलम गोऱ्हेंकडून दखल

आदिवासी भागातील नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्यावर अशी वेळ का आली
आदिवासी मुलांच्या विक्री प्रकाराची नीलम गोऱ्हेंकडून दखल

नाशिक येथील आदिवासी पालकांनी आर्थिक अगतिकतेतून मुलांची विक्री केल्याचा दुर्दैवी प्रकार चर्चेत आहे. त्याची माहिती मिळताच विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्याची दखल घेत सरकारला पत्र लिहून कार्यवाहीचे निर्देश दिले.

आदिवासी भागातील नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्यावर अशी वेळ का आली, याबाबत सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश रविवारी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. त्यांच्या कार्यालयातून रविवारी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाधरन आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत गोऱ्हे यांनी नाशिक आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल हिरामणी आणि अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याशीसुद्धा चर्चा केली. याविषयी पोलीस यंत्रणेकडून योग्य तो अहवाल सादर करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी कळवले आहे. नाशिक आणि अहमदनगर भागातील आदिवासी पालकांनी आपल्या पोटाच्या मुलांना पैशांपोटी विकल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला लक्ष घालण्याचे निर्देश केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in