Pune : चहा विक्रेत्याने १० परीक्षार्थींना डांबले; NEET पेपरफुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा

वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा केला आहे. पुण्यात कोचिंग सेंटरबाहेर चहाची टपरी चालवणाऱ्या एका व्यक्तीने १० परीक्षार्थींना नाशिकमध्ये डांबून ठेवत प्रश्नपत्रिका पुरवल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
Pune : चहा विक्रेत्याने १० परीक्षार्थींना डांबले; NEET पेपरफुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा
Pune : चहा विक्रेत्याने १० परीक्षार्थींना डांबले; NEET पेपरफुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

पुणे : वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा केला आहे. पुण्यात कोचिंग सेंटरबाहेर चहाची टपरी चालवणाऱ्या एका व्यक्तीने १० परीक्षार्थींना नाशिकमध्ये डांबून ठेवत प्रश्नपत्रिका पुरवल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सीबीआयने संबंधित चहाच्या टपरीचालकाविरुद्ध न्यायालयात अधिकृत आरोपपत्र दाखल केले आहे.

पुण्यातील एका कोचिंग सेंटरबाहेर असलेल्या 'मालक चहा' नावाच्या स्टॉलचा मालक शेषराव बजरंग सूर्यवंशी याच्यावर या संपूर्ण कटाचे सूत्रधार असल्याचा ठपका ठेवला. तो या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटमधील १४ वा आरोपी ठरला आहे. एप्रिलमध्ये ‘नीट’ची तयारी करणारे दोन विद्यार्थी या चहाच्या टपरीवर बसून पेपरच्या काठिण्यपातळीबद्दल आणि भविष्याबद्दल चिंतेत चर्चा करत होते. त्याच वेळी टपरीचालक सूर्यवंशी याने या विद्यार्थ्यांशी स्वतःहून संवाद साधत, एक डॉक्टर मित्र थेट ‘नीट’ परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका मिळवून देऊ शकतो, असा मोठा दावा केला.

हा व्यवहार ठरल्यानंतर, सूर्यवंशीने या दोन्ही विद्यार्थ्यांना नाशिक जिल्ह्यातील पंचक गावातील एका घरात नेले. त्या ठिकाणी आधीपासूनच अन्य आठ विद्यार्थी हजर होते, ज्यामुळे तेथे १० परीक्षार्थी एकत्र झाले. कोणीही पळून जाऊ नये यासाठी सूर्यवंशी याने या सर्व १० विद्यार्थ्यांची १० वी व १२ वीची मूळ गुणपत्रके, प्रमाणपत्रे ताब्यात घेतली.

तांत्रिक तपासाने अटक

अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे सीबीआयने २ सप्टेंबर रोजी शेषराव सूर्यवंशी याला अटक केली. त्याच्या मोबाईलची सखोल तपासणी केली असता, ३० एप्रिल रोजी एका विद्यार्थिनीच्या हातात लीक झालेल्या नीट प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स प्रत असलेला फोटो सीबीआयच्या हाती लागला. या प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे सीबीआयने त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करत पेपरफुटीच्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in