नेरळ - माथेरान मिनी ट्रेन लवकरच पर्यटकांच्या सेवेत 

२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान डोंगर भागातून जाणाऱ्या रुळांचे मोठे नुकसान झाले होते
नेरळ - माथेरान मिनी ट्रेन लवकरच पर्यटकांच्या सेवेत 

नेरळ-माथेरान मार्गाच्या रुळांसह अन्य कामे मागील अनेक महिन्यांपासून सुरु होती. सद्यस्थितीत बहुतांश महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यानंतर गुरुवार २९ सप्टेंबरपासून या ट्रेनची चाचणी सुरू आहे. २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान डोंगर भागातून जाणाऱ्या रुळांचे मोठे नुकसान झाले होते. रुळांखालील खडीही वाहून गेल्या होत्या. त्यामुळे नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा मार्ग बंद ठेवण्यात आला. यामुळे र्पयटकांचा हिरमोड होत होता. तर, स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. सद्यस्थितीत बहुतांश कामे पूर्ण झाली असून ३ वर्षानंतर लवकरच मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच अद्याप काही कामे बाकी असून ही कामे पूर्ण होताच लवकरच मिनी ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

ही कामे पूर्ण 

- नेरळ - माथेरान मार्गावर नवीन रूळ, खडी 

- नेरळ - अमन लॉज मार्गावर २० किलोमीटरच्या नवीन रुळांचे काम हाती 

- अपघात होऊ नये यासाठी रुळांच्या बाजूला उपाययोजना 

logo
marathi.freepressjournal.in