नेरळमधील वाहतूककोंडी ठरतेय डाकेदुखी

नेरळमधील वाहतूककोंडी ठरतेय डाकेदुखी

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मेन लाइनवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुढे कर्जत दिशेकडे रेल्वे फाटक आहे.
Published on

विजय मांडे/ कर्जत

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मेन लाइनवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुढे कर्जत दिशेकडे रेल्वे फाटक आहे. त्या रेल्वे फाटकातून नेरळ पूर्ण आणि नेरळ पश्चिम भागाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे दररोज वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नेरळ पाडा भागात राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूककोंडी ही नेहमीची डोकेदुखी ठरत आहे.

नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. मुंबई-पुणे मार्गावर ८६ किलोमीटर येथे मध्य रेल्वेचे फाटक असून हे फाटक परिसरातील अनेक गावातील वाहनांसाठी ये-जा करण्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. नेरळ पूर्व भागातील किमान ४० हून अधिक गावांतील वाहने कर्जतकडे जाण्यासाठी या रेल्वे फाटकाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. शनिवार आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

पंचवटी भागात होणार उड्डाणपूल

सध्या रेल्वे फाटक असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला लागून निवासी घरे आहेत. त्यामुळे तेथे उड्डाणपूल होण्याची शक्यता कमी आहे. राज्य शासनाने या भागातील पंचवटी भागातून रेल्वेवरून जाणारा उड्डाणपूल बनविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून सध्याच्या रेल्वे फाटकाच्या जागी भुयारी पूल होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in