दर्शना पवार मृत्यू प्रकरणात सीसीटीव्हीच्या आधारे नवीन माहिती समोर

दर्शनाचा मित्र राहुल यानेच खून केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे
दर्शना पवार मृत्यू प्रकरणात सीसीटीव्हीच्या आधारे नवीन माहिती समोर

राज्यसेवा परिक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार या २६ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्या आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत दर्शनाचा मृतदेह सापडला. दर्शना तिच्या एका मित्रासोबत ट्रेकिंग गेले आणि त्यानंतर परतलीच नाही. यानंतर जवळपास आठ दिवसांनी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. सुरुवातील या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पण जवळ पडलेल्या वस्तूंनी तिची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. दर्शना ही आपल्या राहुल हंडोरे या मित्रासोबत राजगडावर ट्रेकिंगला गेली होती. दर्शनाचा मृतदेह सापडला मात्र राहुल हा सध्या फरार आहे. आता या घटनेत एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यानुसार दर्शनाचा मित्र राहुल यानेच खून केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. यानुसार दर्शना आणि राहुल यांच्या संपर्कातील अनेकांची चौकशी करण्यात येणार आहे.

या घटनेत समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन दर्शना आणि राहुल दोघे १२ जून रोजी राजगडावर दुचाकीने गेले होते. ६ वाजून १५ मिनिटांनी ते गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यांनी गड चढायला सुरुवात केली. मात्र, १० वाजेच्या सुमरास राहुल हा एकटाच गडावरुन येताना दिसला. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. सध्या राहूल हा बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचं मोबाईल लोकेशन बाहेर राज्यातील दिसत आहे. राहुल याने दुसऱ्यांच्या फोनवरुन माहिती दिली आहे. याप्रकणात आपण काही केलं नसल्याचं त्याने त्याच्या घरच्यांना सांगितलं आहे. पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठ आव्हान आहे.

logo
marathi.freepressjournal.in