नाचनची याचिका न्यायालयाने फेटाळली

पुण्यातील आयसिस भरती आणि कट्टरतावाद प्रकरणातील आरोपी आकिफ नाचन याला विशेष एनआयए न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याची नाचनची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली असून त्याच्याविरुद्ध गंभीर ताशेरे ओढले आहेत.
नाचनची याचिका न्यायालयाने फेटाळली
नाचनची याचिका न्यायालयाने फेटाळली
Published on

मुंबई : पुण्यातील आयसिस भरती आणि कट्टरतावाद प्रकरणातील आरोपी आकिफ नाचन याला विशेष एनआयए न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याची नाचनची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली असून त्याच्याविरुद्ध गंभीर ताशेरे ओढले आहेत. आकिफ नाचन हा तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्यासोबतच इतर राज्यांतील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या फरार आरोपींना रसद पुरवण्यात सक्रिय होता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

तपासादरम्यान नाचनच्या ताब्यातून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, संदेश आणि आयसिसची मासिके जप्त करण्यात आली आहेत. तो तरुणांना बॉम्बस्फोट, शस्त्रास्त्रांचा वापर आणि आयसिसशी संबंधित प्रक्षोभक व्हिडीओ शेअर करत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. या साहित्याचा वापर करून तो मुस्लिम तरुणांना आयसिसमध्ये सामील होण्यासाठी आणि खिलाफत स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत होता. नाचन हा आयसिसचा स्वयंघोषित अमीर-ए-हिंद साकिब नाचन याचा जवळचा सहकारी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आकिफ नाचनवर तरुणांची भरती करून त्यांना आयईडी स्फोटके आणि लहान शस्त्रास्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे.

logo
marathi.freepressjournal.in