एनआयएची पाच राज्यांत छापेमारी

मालेगाव, कोल्हापूरात कारवाई : पीएफआयशी संलग्नित संशयित ताब्यात
एनआयएची पाच राज्यांत छापेमारी

नाशिक : एनआयएने महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल या पाच राज्यांत रविवारी छापेमारी केली. पीएफआय या बंदी असलेल्या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे. मुंबर्इ एनआयएच्या टीमने रविवारी पहाटे मालेगाव शहरात कारवाई करत पीएफआयशी संलग्न असलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन पाच तासांच्या चौकशीनंतर सोडले.

काही महिन्यांपूर्वी एटीएसच्या माध्यमातून पीएफआयशी संबंधित असलेल्या संशयिताला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले होते. अशातच रविवार पहाटे पुन्हा मालेगाव शहरात एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची पाच तास चौकशी करण्यात आली. एनआयएच्या मुंबई टीमने मालेगावात कारवाई पीएफआयशी संलग्न असलेल्या एका संशयितास ताब्यात घेत त्याची चौकशी केली. चौकशीसाठी पुन्हा बोलवले जाईल, असे सांगून त्याला सोडण्यात आले. सातत्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे दहशतवादी कारवाया करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील एक मुख्य केंद्र होऊ पाहत आहे. कारण काही महिन्यापूर्वी झालेल्या कारवाईनंतर आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगावात एनआयए ने कारवाई केली आहे.
शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या गुफरान खान सुभान खान याच्या घरी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास झाडाझडती घेत त्याला घरातून ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात नेले. गुफरानचा परदेशात कोणाशीतरी संपर्कात असून मोबाईलवरुन परदेशात कॉल करतो, तसेच तो पीएफआय संघटनेचा सदस्य असून तो मुलांना फिजिकल ट्रेनिंग देण्याचे काम करत असल्याचा त्याच्यावर संशय होता. एनआयएच्या मुंबई टीमने त्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेले. तिथे त्याची पाच तास चौकशी करुन सोडले. दरम्यान यापूर्वी देखील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून पीएफआयशी संबंधित काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर दहशतवादी संघटनांना मदत करण्याच्या कारणावरुन मधल्या काळामध्ये एकाला अटक करण्यात आली होती. मालेगावलाच गेल्या वर्षी पीएफआय संघटनेविरुद्ध दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो आरोपीही होता. दरम्यान झाडाझडतीत तो मोबाईल आढळून आला का? इतर काही आक्षेपार्ह कागदपत्रे एनआयए च्या हाती लागली आहेत का? याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नसून या कारवाईमुळे बंदी घालण्यात आलेली पीएफआय संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये संशयिताची दहशतवादी कारवायांच्या कारणावरुन चौकशी झाली.

दरम्यान, एनआयएने कन्नूर, मलप्पुरम, दक्षिण कन्नड, कोल्हापूर, मुर्शिदाबाद आणि कटिहार येथेही छापेमारी केल्याचे वृत्त आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in