राष्ट्रीय तपास संस्था (NIA)महाराष्ट्रात छापेमारी सुरु केली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरुन एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी सुरु आहे दहशतवादी कारवायांच्या संशयावरुन एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी सुरु आहे. NIA ने ISIS च्या संपर्कात असलेल्या नागपाडा येथील रहिवाशाविरुद्ध २८ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी संशय वाढल्याने NIA कडून संशयीत ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
NIA ने मुंबईतील नागपाडा येथील रहिवाशांवर ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर NIA या प्रकरणात आणखी काही जण संपर्कात असल्याचा संशय आला. त्यामुळे मुंबई आणि भिवंडी येथील प्रत्येकी दोन तर पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मुंबईसह पुण्यात NIA ने सर्च ऑपरेशन राबवत नागापाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे. NIAच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती ही अनेक दिवसांपासून दहशतवादीसंघटनेच्या संपर्कात होती.
पुण्यात देखील NIA आणि IB ची छापेमारी सुरु आहे. या दोन्ही पथकाकडून पुण्यातील कोंढवा येथे छापेमारी करुन एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये ही छापेमारी करण्यात आली. यात जुबेर शेख नामक ३९ वर्षीय व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.