Pune : वसंत मोरेंना माझी गरज नसेल तर...; निलेश माझिरे यांची टीका

पुण्यातील (Pune) मनसेमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळत असून वसंत मोरे आणि त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे निलेश माझिरे यांच्या वादाची जोरदार चर्चा सुरु
Pune : वसंत मोरेंना माझी गरज नसेल तर...; निलेश माझिरे यांची टीका

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. तर, दुसरीकडे पुण्यामध्ये (Pune) त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमधील वादाची मात्र चांगलीच चर्चा होते आहे. पुण्यातील मनसेचे तडफदार नेते वसंत मोरे आणि त्यांचेच कट्टर समर्थक असणारे निलेश माझिरे यांच्यात आता कटुता आली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून निलेश माझिरे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांनी ४०० कार्यकर्त्यांसह पक्ष सोडल्याचे जाहीर केले. यामुळे दोघांमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला.

निलेश माझिरे यांनी पक्ष सोडल्यानंतर 'आता माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही' अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली होती. यावरून नाराज झालेल्या माझिरे एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, "वसंत मोरेंचे वक्तव्य माझ्या वाचनात आले. त्यांनीच म्हंटले होते की, पक्षात असो किंवा नसो, आपली मैत्री राहील. पण आता आपली मैत्री संपलीय का? त्यांचे हे वक्तव्य ऐकून मला दुःख झाले. पण जर त्यांना माझी गरज नसेल तर मलाही त्यांची गरज नाही."

पुढे ते म्हणाले की, "ज्यावेळी ते अडचणीत होते, तेव्हा मी त्यांच्यासोबत थांबलो होतो. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र आता मी अडचणीत असताना त्यांनी असे बोलणे चुकीचे आहे. राजसाहेब माझे विठ्ठल आहेत. माझा वाद हा पक्षातील बडव्यांशी आहे. आता काहीजण विचारतात की, निलेश माझिरेसोबत पक्षातून बाहेर पडायला ४०० कार्यकर्ते कुठे आहेत? पण याच निलेश माझिरेने दोन महिन्यांपूर्वी २०० लोकांचा प्रवेश घडवून आणला होता."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in