मुंबई-नाशिक महामार्गावरील उंबरखांड येथे नीलगायीचा मृत्यू

शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील उंबरखांड गावाजवळ वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या नीलगायीचा मृत्यू झाला.
मुंबई-नाशिक महामार्गावरील उंबरखांड येथे नीलगायीचा मृत्यू

शहापूर : शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील उंबरखांड गावाजवळ वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या नीलगायीचा मृत्यू झाला. एकाचवेळी १५ ते २० गायींचा कळप मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडत असताना कळपातील एका नीलगायीला रात्रीच्या वेळी जोरात धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला. वन्यजीव अशा प्रकारे रस्ते अपघातात जीव गमावत असल्याचे दिसून येत आहे. अपघात रोखण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in