नितेश राणेंना कारावासाची शिक्षा; चिखलफेकप्रकरणी निर्दोष, मात्र शांतता भंगाबद्दल दोषी, स्थगितीसाठी उच्च न्यायालयात धाव   

मुंबई-गोवा महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सोमवारी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य २९ जणांची कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा) मधून निर्दोष मुक्तता केली आहे.
नितेश राणेंना कारावासाची शिक्षा; चिखलफेकप्रकरणी निर्दोष, मात्र शांतता भंगाबद्दल दोषी, स्थगितीसाठी उच्च न्यायालयात धाव   
नितेश राणेंना कारावासाची शिक्षा; चिखलफेकप्रकरणी निर्दोष, मात्र शांतता भंगाबद्दल दोषी, स्थगितीसाठी उच्च न्यायालयात धाव   संग्रहित छायाचित्र
Published on

ओरोस : मुंबई-गोवा महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सोमवारी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य २९ जणांची कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा) मधून निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांना दोषी ठरवून एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी हा निकाल दिला. राणे यांच्या वकिलांनी या शिक्षेला स्थगिती मिळवून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

संशयितांच्या वतीने ॲड. संग्राम देसाई यांनी तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रूपेश देसाई यांनी बाजू मांडली. याप्रकरणी तातडीने निर्णयाला स्थगिती घेत उच्च न्यायालयात अपील करण्यात आले आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी ४ जुलै २०१९ रोजी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी अभियंता प्रकाश शेडेकर यांना कणकवली येथील गडनदी पुलावर बोलावले होते. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतून त्यांना पुलाला बांधून ठेवले होते. या घटनेनंतर राज्यभर मोठी खळबळ माजली होती.

logo
marathi.freepressjournal.in