फडणवीसांना अडचणीत आणायला १०० जन्म घ्यावे लागतील, नितेश राणेंचा जरांगेंवर पलटवार

प्रत्येकाचा नंबर आमच्याकडे आहे. आज नाहीतर उद्या पोलीस तुमच्या घरात येतील, नितेश राणे म्हणाले...
Nitesh Rane Press Conference
Nitesh Rane Press Conference

"सागर बंगल्यावर आमची भिंत लागली आहे. ती पार करणं ही स्वप्नातली गोष्ट आहे. मराठा समाजाशी आमची लढाई नाही. एक व्यक्ती मराठा समाजाला वेठीस धरत असेल, तर ही गोष्ट आमचा समाज खपवून घेणार नाही. राजकारण सोडून जरांगेंनी भूमिका घेतली तर आम्ही जरांगेंसोबत आहोत. राजकीय आंदोलनाला आम्ही कुणीही पाठिंबा देणार नाही किंवा स्वागत करणार नाही. जी लोक आम्हाला जरांगे पाटील यांचा समर्थक समजत आहेत, त्यांना सांगायचंय की, प्रत्येकाचा नंबर आमच्याकडे आहे. आज नाहीतर उद्या पोलीस तुमच्या घरात येतील, तेव्हा कुणीही तुम्हाला वाचवणार नाही."निवडणुकीपूर्वी आम्ही फडणवीसांना अडचणीत आणू, असं जरांगे पाटील बोलतात, या प्रश्नावर उत्तर देताना भाजपचे आमदार नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले, "फडणवीसांना अडचणीत आणायला शंभर जन्म घ्यावे लागतील."

पत्रकार परिषदेत राणे यांनी विरोधकांना समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, "जरांगे यांच्यासोबत असणाऱ्या तरुण मुलांनाही सांगतो, की उगाचच अंगावर केसेस घेऊ नका. केसेस काढण्यासाठी कुणीही येत नाहीत. ही शिवराळ भाषा कुणाच्या जोरावर बोलली जातेय, त्यांचे सहकारी बोलायतेत की, हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत. मग हे तुतारीचे आवाज बाहेर येत आहेत का. मराठा समाजासोबत आमचं महायुतीचं सरकार आहे. हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीसोबत आमचं युतीचं सरकार आहे. संजय राजाराम राऊतांची रात्रीची उतरली असेल, तर कालपासून ते कुणा कुणाशी संपर्क साधत होते, याचे जरा कॉल रेकॉर्ड बघीतले पाहिजेत."

"सिल्व्हर ओकला किती फोन गेले. जरांगे पाटील यांच्या आजूबाजूला किती फोन गेले. या सगळ्याचा कधीतरी सीडीआर तपास निघाला पाहिजे. जेणेकरून कळेल की, ही स्क्रिप्ट नेमकी कुणाची आहे. जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांवरच कशाला टीका करतात. शरद पवार गटातील लोकही अशीच टीका फडणवीसांवर करत आहेत. जी भाषा उद्धव ठाकरे सातत्याने माध्यमांतून करतात. तीच भाषा जरांगे पाटील करत आहेत.

भाषण कॉपी पेस्ट केलंय की काय. स्क्रिप्टचा ईमेल आणि मेसेज कुठून येतोय, हे लोकांना कळालं पाहिजे. जरांगेंना सांगायचं आपण आरक्षणावर बोलू, सग्यासोयऱ्यांवर बोलू. कोर्टात आरक्षणाची केस गेल्यावर फडणवीसच मोठा वकील लावून आपली बाजू धरणार आहेत. उद्धव ठाकरे ते करणार नाहीत. फडणवीस अडचणीत आणायाल १०० जन्म घ्यावे लागतील. जरांगे पाटलांची नार्को टेस्ट करा. खरं काय ते कळेल. फडणवीस मराठा आरक्षणाची बाजू लावून धरणार. एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही." असंही राणे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in