Sindhudurg : पक्षाच्या प्रतिमेला ‘गालबोट’ लावणाऱ्यांची गय नाही! नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मटका, जुगार, दारू यांसह विविध अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
Sindhudurg : पक्षाच्या प्रतिमेला ‘गालबोट’ लावणाऱ्यांची गय नाही! नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा
Sindhudurg : पक्षाच्या प्रतिमेला ‘गालबोट’ लावणाऱ्यांची गय नाही! नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा(Photo-X)
Published on

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मटका, जुगार, दारू यांसह विविध अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. पक्षाचे नाव वापरून अवैध धंद्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.

सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हा भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लागेल, असे कोणतेही काम कार्यकर्त्यांनी करू नये. पक्षाची प्रतिमा खराब करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन समितीचा निधी हा जनसेवेसाठीच असून, त्याचा वापर पक्षवाढीसाठी करू नये, असे आवाहनही नितेश राणे यांनी केले. आगामी काळात पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधातही कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.शेतकरी, मच्छिमार, महिला तसेच अन्य घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गातील मत्स्यव्यवसाय आणि बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

भाजपचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचवा : रवींद्र चव्हाण

भाजप हा राष्ट्रहित जोपासणारा पक्ष असून, पक्षाचे विचार तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ‘हर घर जल’ योजनेद्वारे ग्रामीण भागात पाणी पोहोचविण्यात आले असून, सौर ऊर्जेच्या वापरालाही चालना दिली जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in