नितेश राणे यांची याचिका निकाली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या मानहानी प्रकरणी मुंबई हायकोर्टात धाव घेणाऱ्या आमदार नितेश राणे यांची उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली.
नितेश राणे यांची याचिका निकाली

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या मानहानी प्रकरणी मुंबई हायकोर्टात धाव घेणाऱ्या आमदार नितेश राणे यांची उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा दणका दिल्यानंतर राणे यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने राणे यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नितेश राणे यांनी सोमवारी कोर्टात हजेरी लावली. दंडाधिकारी न्यायालयाने याची दखल घेत जामीन मंजूर केला. त्यामुळे याचिकेत काहीच उरलेले नसल्याने सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांनी दखल घेत याचिका निकाली काढली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in