Video : महायुतीच्या जाहीरसभेत भाषणादरम्यान नितीन गडकरींना भोवळ

भोवळ येताच अंगरक्षकांनी त्यांना सावरले आणि खुर्चीवर बसवले. वैद्यकीय उपचारांनंतर त्यांची प्रकृती पूर्ववत झाल्यावर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
Video : महायुतीच्या जाहीरसभेत भाषणादरम्यान नितीन गडकरींना भोवळ
Published on

पुसद : यवतमाळमधील पुसद येथे बुधवारी महायुतीच्या जाहीरसभेत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना भाषण करताना अचानक अस्वस्थ वाटून भोवळ आली. भरसभेत भोवळ येण्याची गडकरी यांची ही पहिलीच वेळ नसून याआधीही त्यांना अनेकदा अशी भोवळ आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने प्रचारसभांना व राजकीय नेत्यांना उन्हाचा तडाखा बसत आहे. मतदानावरही त्याचा परिणाम झाल्याचे पहिल्या टप्प्यात दिसून आले होते. यवतमाळ जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी पुसद येथे नितीन गडकरी यांची जाहीरसभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. भर उन्हात नितीन गडकरी भाषण करत होते. त्यांना भाषण करताना अचानक अस्वस्थ वाटू लागले व व्यासपीठावरच भोवळ आली.

भोवळ येताच अंगरक्षकांनी त्यांना सावरले आणि खुर्चीवर बसवले. या घटनेने उपस्थित नेते आणि कार्यकर्ते चिंताग्रस्त झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तत्काळ उपचार केले. वैद्यकीय उपचारांनंतर त्यांची प्रकृती पूर्ववत झाल्यावर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

logo
marathi.freepressjournal.in