शरद पवारांच्या उंचीची माणसे कुठे मिळणार? नितीन गडकरींची शरद पवारांवर स्तुतीसुमने;  म्हणाले, “महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे...”

राजकारणाचा अर्थ दुर्दैवाने सत्ताकारण असा करण्यात आला. राजकारण म्हणजे राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण, धर्मनीती आहे, असेही गडकरी म्हणाले.
शरद पवारांच्या उंचीची माणसे कुठे मिळणार? नितीन गडकरींची शरद पवारांवर स्तुतीसुमने;  म्हणाले, “महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे...”

"पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यांच्या नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आल्याने पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली. पण, दरवर्षी शरद पवार यांच्या उंचीची माणसे कुठे मिळणार? विविध क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभे राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार", असे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 125 रुपयांचे नाणे जारी केले. नितीन गडकरी यांच्या हस्ते या नाण्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

गडकरी म्हणाले की, पंजाबरावांची तळमळ, व्हिजन शरद पवार यांच्याकडे आहे. राजकीय धुळवड सुरु असते. मात्र, या राजकीय धुळवडीत पंजाबराव देशमुख, शरद पवार यांसारख्या नेत्यांचे नाव, कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहते.

राजकारणाचा अर्थ दुर्दैवाने सत्ताकारण असा करण्यात आला. राजकारण म्हणजे राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण, धर्मनीती आहे. राजकारण हेच समाजकारण आहे असे समजून कृषी, शिक्षण, सांस्कृतीक कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रासाठी आणि त्यातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभे राहणारे महाराष्ट्रातील नेतृत्व म्हणजे शरद पवार पवार, असे गडकरी म्हणाले.  

logo
marathi.freepressjournal.in