नितीन गडकरी धमकी प्रकरणात संशयित तरुणी ताब्यात; पोलिसांनी दिली 'ही' माहिती

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात तब्बल तीनवेळा धमकीचे फोन आले
नितीन गडकरी धमकी प्रकरणात संशयित तरुणी ताब्यात; पोलिसांनी दिली 'ही' माहिती

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात तब्बल ३ वेळा धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. यावेळी तब्बल १० कोटींची खंडणी मागण्यात आली होती. अशामध्ये आता पोलिसांच्या तपासात मोठी माहिती मिळाली असून यामध्ये मंगळुरू कनेक्शन समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एका तरुणीला मंगळुरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आता नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला रवाना झाली आहे.

नागपुर पोलिसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मंगळूरूमध्ये एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. नितीन गडकरींच्या कार्यालयामध्ये धमकीचा फोन जाण्यापूर्वी या तरुणीला आम्ही तुझा नंबर एका कामासाठी देत असल्याचे फोन करून सांगण्यात आले होते. त्या तरुणीही जयेश पुजारी याच नावावरून फोन आला असल्याची पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ आणखी वाढत चालले आहे. दरम्यान, धमकीचा फोन आणि त्या तरुणीला केलेला फोन हे दोन्हीही फोन बेळगावच्या तुरुंगातूनच आल्याचे तपासात समोर आले आहे.

विशेष म्हणजे, अशी माहिती समोर आली आहे की ती तरुणी गेल्या काही महिन्यापासून मंगळुरुच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. सध्या तिची स्थानिक पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली असून या प्रकरणी तपास मात्र वेगाने सुरु आहे. दरम्यान, नागपूर पोलिसांनी धंतोली पोलीस स्थानकामध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात धमकी देणे आणि खंडणी मागणे असे गुन्हे दाखल केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in