गंगा भागिरथी बाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही - मंगलप्रभात लोढा

गंगा भागिरथी बाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही - मंगलप्रभात लोढा

राज्यातील विधवा यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांना विधवा ऐवजी इतर नावाने संबोधण्यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक निवेदन दिले होते

विधवा स्त्रियांना गंगा भागिरथी संबोधण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वांशी चर्चा करुनच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात विधवा हे नाव बदलण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाच्या माध्यमातून चर्चेसाठी हे निवेदन सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.हा प्रस्ताव माझा नसून महिला आयोगाच्या निवेदनानंतर चर्चेसाठी सचिवांकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर महिलांचे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

विधवा महिलांना गंगा भागिरथी अशा शब्दाने संबोधता येईल का याबाबत विचार करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच केली होती. या भूमिकेला राज्यातील अनेक महिला संघटनांनी विरोध दर्शविला आहे. विरोधी पक्षांनीही यावर टीका केली आहे.त्याला उत्तर देण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.

यावेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील विधवा यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांना विधवा ऐवजी इतर नावाने संबोधण्यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक निवेदन दिले होते. त्याचबरोबर यासंदर्भात इतरही अनेक निवेदन प्राप्त झाली होती. त्यानुसार नियमानुसार यावर चर्चा करण्यासाठी हे निवेदन प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आले आहे. त्यानुसार याबाबत चर्चा करुन प्रस्ताव सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा शासन निर्णयही जाहीर करण्यात आलेला नाही. सर्वांशी चर्चा केल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तर गंगा भागिरथी याशिवाय इतरही अनेक नावे प्राप्त झाली असून त्यासंदर्भातील पत्रही सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली. तर हा प्रस्ताव माझा नसून महिला आयोगाच्या निवेदनानंतर चर्चेसाठी सचिवांकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तर महिलांचे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

विधवा या शब्दाला पर्यायी शब्द वापरण्यासंदर्भात आणि त्यांना सन्मान देण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे मार्च महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. यासंदर्भात महिला आयोगाकडे अनेक निवेदन प्राप्त झाली असून त्यानुसार विधवा असल्यामुळे समाजात आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक कार्यात सहभागी होत असताना असमानतेची वागणूक दिली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय, सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर विधवा शब्दाऐवजी पूर्णांगी, स्वयंसिद्धा, सक्षमा या शब्दांचा वापर केल्यास या भगिनींना सन्मानतेची वागणूक मिळेल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लिहलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in