हमीभाव नाही, १ रुपयांत पीक विमा, शेतकऱ्यांची फसवणूक; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

विधानसभेत २९३ अन्वये हरकतीचा मुद्दा उपस्थित केला
हमीभाव नाही, १ रुपयांत पीक विमा, शेतकऱ्यांची फसवणूक; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
Twitter/@VijayWadettiwar
Published on

मुंबई : हमीभाव नाही, शेतमाल खरेदी करायचा नाही, १ रुपयांत पिक विमा कागदावरच, संपूर्ण कर्ज माफी, वीज बिल माफ महायुतीच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी पक्षावर केला. २९३ अन्वये वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित करत शेतकरी आसमानी संकटात असताना महायुतीमुळे सुलतानी संकटात शेतकरी सापडला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

सरसकट कर्ज माफी, वीज बिल माफ, छावण्याची दुरवस्था, जनावरांसाठी दिवसभरात फक्त एक लिटर पाणी, अवकाळी पावसामुळे ११ हेक्टर जमीनीचे नुकसान झाले. हरिप हंगाम वाईट गेला, केंद्र सरकारने गेल्या वर्षी ही शेतकऱ्यांना मदत केली नाही, असे ही ते म्हणाले. युरीया खत आधी ५० किलोची बॅग २,२६० रुपयांत मिळत होती, त्यात वाढ करत आता २,४६० रुपयांना युरिया खताची बॅग मिळते. मात्र आता ५० किलो ऐवजी ४० किलोची बॅग केली, यात १० किलो कोणाच्या खिशात घातले, असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

सोन्यावर २ टक्के जीएसटी, हिऱ्यावर ३ टक्के जीएसटी मात्र शेतकऱ्यांसाठी मुख्य साहित्य असलेल्या ट्रॅक्टर वर १८ टक्के जीएसटी याचा अर्थ महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काही घेणं देणं नाही, असा टोला त्यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला.

आज विरोधात तुम्हाला शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. परंतु सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची जाण असू द्या, अशी टीका विधान सभा सदस्य बच्चू कडू यांनी वडेट्टीवार यांच्यावर केली.

logo
marathi.freepressjournal.in