महामार्ग, द्रुतगती महामार्गावर २० किमीपर्यंत टोलमाफी; GNSS सिस्टीम बंधनकारक; केंद्रीय रस्ते महामार्गाची अधिसूचना जारी
प्रातिनिधिक फोटो

महामार्ग, द्रुतगती महामार्गावर २० किमीपर्यंत टोलमाफी; GNSS सिस्टीम बंधनकारक; केंद्रीय रस्ते महामार्गाची अधिसूचना जारी

ज्या कारमध्ये ग्लोबल नेव्हीगेशन सॅटेलाइट सिस्टीम (जीएनएसएस) बसवलेली असेल. त्या वाहनांना महामार्ग (हायवे), द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस-वे) २० किमीपर्यंत दररोज टोलमाफी मिळेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग खात्याने केली आहे.
Published on

नवी दिल्ली : ज्या कारमध्ये ग्लोबल नेव्हीगेशन सॅटेलाइट सिस्टीम (जीएनएसएस) बसवलेली असेल. त्या वाहनांना महामार्ग (हायवे), द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस-वे) २० किमीपर्यंत दररोज टोलमाफी मिळेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग खात्याने केली आहे. याबाबतची अधिसूचना या खात्याने काढली आहे.

रस्ते व महामार्ग खात्याने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २००८ मध्ये सुधारणा केली असून त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून तत्काळ सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग शुल्क सुधारणा नियम २०२४ नुसार, ही २० किमी अंतरानंतर केलेल्या अंतरावर आता शुल्क आकारले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, स्थायी पूल, बायपास रस्ता, बोगद्यातील रस्ता आदी मार्गावरील सुरुवातीचे २० किलोमीटर मोफत प्रवास करता येणार आहे. राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना या नियमांनुसार लाभ घेता येणार नाही.

जीएनएसएस फिट केलेल्या वाहनासाठी विशेष मार्गिका तयार केली जाऊ शकते. वाहन वैध, कार्यशील जीएनएसएस युनिटशिवाय या मार्गिकेवरून प्रवेश करत असल्यास त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल.

वाहनाने २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला तर वाहनधारकांकडून पुढच्या वीस किलोमीटरप्रमाणे फीस वसूल केली जाईल. या बदलांचा उद्देश हा जवळच्या प्रवासासाठी चालकांचा बोजा कमी करण्यासाठी आहे. लांबच्या प्रवासासाठी योग्य ते शुल्क आकारले जाणार आहे.

यंदाच्या जुलैमध्ये महामार्ग खात्याने जीएनएसएसवर आधारित टोल वसुली यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. काही ठरावीक महामार्गावर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू केली. बंगळुरू-म्हैसुरू विभाग व पानीपत-हिस्सार विभागात ही जीएनएसएसवर आधारित यंत्रणा बसवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in