पुन्हा कोरोनाची धास्ती! शिर्डीच्या साई मंदिरात 'नो मास्क नो दर्शन'

देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने केंद्राने राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
पुन्हा कोरोनाची धास्ती! शिर्डीच्या साई मंदिरात 'नो मास्क नो दर्शन'
PM

शिर्डी : देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने केंद्राने राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. जेएन-१ च्या पार्श्वभूमीवर या सूचना करण्यात आलेल्या आहेत. शिर्डीच्या साई मंदिरात आता मास्क सक्ती कपण्यात आलेली आहे. साईंच्या दर्शनासाठी देशभरातून लोक येत असतात. त्यामुळे सतर्कता म्हणून साई मंदिरात हा नियम लागू करण्यात येणार आहे. याविषयीच्या सुचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी साई संस्थानाला सुचना दिल्या आहेत. मंदिरात आलेल्या भाविकांना संस्थानकडून मास्क पुरवले जावेत. मंदिराच्या बाहेर नो मास्क नो दर्शनचा मोठा बोर्ड लावावा अशा सुचना दिल्याचे विखे-पाटील म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थान सज्ज झालेले असून, हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in