
अवकळी पावसात होर्डिंगच्या आश्रयाला गेलेल्या नागरिकांवर होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत ५ जण ठार झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या रावेत किवळे परिसरात घडली. या घटनेत आणखी तिघे जण जखमी झाले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांनी रावेत किवळे येथील मुंबई-पुणे महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील पंक्चरच्या दुकानाजवळ होर्डिंगचा आडोसा घेतला. अचानक यावेळी जाहिरातीचे २ मोठे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे खाली कोसळले होर्डिंग कोसळले. त्याखाली ८ जण अडकले. घटनेनंतर तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या पथकाने स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले. घटनेत ५ जणांचा मृत्यू, तर १ जण जखमी असल्याचे समजते. मृतांमध्ये ४ महिला आणि १ पुरुषाचा समावेश आहे.