दीड महिन्यानंतर भुमरे यांच्या राजीनाम्याची अधिसूचना; भुमरेंची खाती मंत्री दादा भुसेंकडे

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर १४ दिवसांत दोन पदांपैकी एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे संदीपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला. भुमरे यांचा राजीनामा राज्यपालांनीही स्वीकारला. मात्र..
संदीपान भुमरे यांचे संग्रहित छायाचित्र
संदीपान भुमरे यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर १४ दिवसांत दोन पदांपैकी एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे संदीपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला. भुमरे यांचा राजीनामा राज्यपालांनीही स्वीकारला. मात्र तब्बल दीड महिन्यानंतर भुमरे यांच्या राजीनाम्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, भुमरे यांची मंत्रिपदाची सूत्रे दादा भुसेंकडे सोपवण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भुमरे यांनी छत्रपती संभाजी नगर मतदार संघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत भुमरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे व एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव करत थेट दिल्ली गाठली. निवडणूक जिंकल्यानंतर विजयी उमेदवाराला एका पदावरच राहता येते. त्यामुळे भुमरे यांनी राज्यातील मंत्री पदाचा राजीनामा देणे पसंत केले. २७ जून रोजी भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. राज्यपालांनी तो तत्काळ स्विकरला. भुमरे यांच्याकडील दोन्ही खाती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु भुमरे यांच्या राजीनाम्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने ७ ऑगस्ट रोजी जारी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in