कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द

आश्चर्यजनक बाब म्हणजे नीलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी स्वतःचे नाव बनावट पद्धतीने वापरले. त्याने ‘Ghaywal’ या आडनावातील ‘h’ काढून टाकत ‘Gaywal’ असे स्पेलिंग लावले. या छोट्या बदलामुळे त्याचा पासपोर्ट आणि त्यावरील तपशील पूर्णपणे अधिकृत दिसत राहिला.
कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द
कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द
Published on

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणात 'मकोका' कारवाईनंतर पोलिसांना चकवा देऊन परदेशात पळून गेलेल्या घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून आदेश जारी करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या अहवालानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पासपोर्ट रद्द झाल्यामुळे नीलेश घायवळच्या अडचणी वाढणार आहेत.

गुंड घायवळच्या कारनाम्यांची माहिती समोर आल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच, यापूर्वीच त्यांनी घायवळची बँक खाती गोठवली होती. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे आता घायवळला भारतात परतणे भाग पडेल, अन्यथा त्याला त्या देशात अवैध ठरवले जाऊन अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे नीलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी स्वतःचे नाव बनावट पद्धतीने वापरले. त्याने ‘Ghaywal’ या आडनावातील ‘h’ काढून टाकत ‘Gaywal’ असे स्पेलिंग लावले. या छोट्या बदलामुळे त्याचा पासपोर्ट आणि त्यावरील तपशील पूर्णपणे अधिकृत दिसत राहिला. त्यामुळे त्याला सहजतेने व्हिसा मिळाला आणि युरोपला जाण्यात कोणतीही अडचण आली नाही.

logo
marathi.freepressjournal.in