मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान येत्या २० नोव्हेंबरला आहे. या निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या संख्येने शिक्षक तैनात केले आहेत. त्यामुळे अनेक शाळांना शाळा चालविणे अशक्य आहे. त्यामुळे १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचे पत्र राज्य सरकारने शाळांना पाठवले आहे.
ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे, त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुट्टीचा निर्णय त्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी घ्यायचा आहे.
निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा या तीन दिवस भरवणे कठीण जात आहे. शिवाय मतदान केंद्र अनेक शाळाच आहेत. या सगळ्याचा विचार करून १८, १९ आणि २० नोव्हेंबर या तीन दिवशी ज्या शाळांना शाळा सुरू ठेवणे शक्य नसेल त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना द्या”, असे विनंतीपत्र राज्य सरकारच्या शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांना पाठवले आहे.